Friday, January 10, 2014

दंतकविता - १


माझ्या कविता वाचणं काही दिवस टाळ
त्यांना सद्ध्या व्हायरसची बाधा झालीये.
लक्षणं माहित नाहीत पण परिणाम काव्यगत असतील.
वरवर हवीहवीशी वाटणारी मात्रावृत्तं पसरतील तुझ्या शरीरात
...अफवेसारखी !


अक्षरगण रोमान्स करतील शहार्‍यांच्या रानात
पेशीउतींतून सळसळतील श्लेष
आणि त्यांचा तू लावलेला तिसरा अर्थ.
ह्या सगळ्यांची नोंद घेत
कवितेखालच्या सहीपाशी पोचलीसच,
तर आरश्यात बघ स्वतःला

मूर्तीमंत दंतकविता उभी असेल.

1 comment: