Monday, December 4, 2017

एक नवीन पृथ्वी बांधूम्हणतो!



कंटाळा आला आहे यार!
तोच तोचगंजलेला किनारा
त्याच बोथट पावसाच्या धारा
आणि जोडीला नेभळट वारा
चारदिशांचा पिंजरा
आणि आभाळाचं ओझं
नकोय हे सगळं...
एक नवीन पृथ्वी बांधू म्हणतो!

दुःखाचा गुडघाभर चिखल
सोबत विचारांचं जंगल
शंकांच्यावावटळी
अज्ञाताचा ताण
आणि तत्वांची हेळसांड!
नकोय हे सगळं
एक नवीन पृथ्वी बांधू म्हणतो!


जुन्या विचारांचा बुजबुजाट
पोथीवादाची रटरटआणि
कुत्र्याच्या छत्र्यांचा बाजार!
मूर्खांचा सुळसुळाट
भीतिचीजळमटं!
नकोय हे सगळं
एक नवीन पृथ्वी बांधू म्हणतो!!


झाडाला फ़ुलंयेतात पण
झाड बहरत नाही
समुद्र रोज खवळतो पण
त्यात गांभिर्य नाही,
उगाचतोच तोच पणाचा बालीशपणा
चंद्र-सूर्य येतात जातात
रुतू आपलं काम करतात
सकाळरात्रीला भेटत नाही
आणि पहाटेला संध्याकाळ दिसत नाही
कंटाळा आलाय यार!
एक नवीन पृथ्वी बांधू म्हणतो!

चिराग पत्की
१५.११.०७

Wednesday, April 27, 2016



परवापासून बेदाणेयुक्त लाडवांच्या पाककृती धुमाकूळ घालत आहेत. त्याच धर्तीवर आम्ही देखील हात धुवून घ्यायचे ठरवले आहे.
सादर आहेत राजकीय लाडवांच्या पाककृती. लाडू पचायला हलके आहेत तरी कुणीही अपचनाचा त्रास करून घेऊ नये.

Friday, January 10, 2014


क्षितीजावरती अजून आहे
कर्म आंधळे जन्माचे
कवेत घेऊ पाहते आहे
स्मरण उद्याच्या जगण्याचे


हायमास्टच्या दिव्यांखाली
मेट्रो वातावरणात,
तुला नुकत्याच निरोप दिलेल्या हातानी
अ‍ॅक्स्लरेट करत,
खटाखट गियर टाकत

दंतकविता - १


माझ्या कविता वाचणं काही दिवस टाळ
त्यांना सद्ध्या व्हायरसची बाधा झालीये.
लक्षणं माहित नाहीत पण परिणाम काव्यगत असतील.
वरवर हवीहवीशी वाटणारी मात्रावृत्तं पसरतील तुझ्या शरीरात
...अफवेसारखी !

माझा लोकलानुभव

स्थळ: ठाणे स्टेशन. सकाळी ८:०३ ची पनवेल लोकल.
 
सोमालियाच्या पायरेट्सनाही लाजवेल अश्या पद्धतीने मी सहप्रवाश्यांशी लढा देऊन विंडोसीट पटकावली. मनातल्या मनात ह्या अचिव्हमेंटसाठी गडगडाटी हास्य करत असतांनाच शेजारी आणि समोर ठिकठिकाणी गंध लावलेले काही इसम येउन बसले. लोकल सुटायला काही मिनीटे असतांना सदर व्यक्तींनी आपापल्या बॅगेतून झांजा वगैरे आयुधे काढायला सुरवात केली. पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याचा अंदाज येत असतांनाच 

Thursday, January 9, 2014

हितोपदेशाचे न्यूजफीड: भाग १

फार वर्षांपूर्वी मगध देशात एक हातोबुद्ध नावाचा राजा राज्य करत होता. नावाप्रमाणेच तो हतबुद्ध होता आणि त्यास प्रजेला हातोहात फसवायची कला देखील अवगत होती. त्याच्या सिंहासनामागे एक मोठे सिंहासन लपवून ठेवले आहे अशी प्रजेत चर्चा होत असे. परंतु हातोबुद्ध ह्या चर्चेला नेहमीच अनावश्यक समजत असे. हातोबुद्ध पूर्वी नरकेसरी नावाच्या राजाचा सल्लागार होता. परंतु देशातील गांधझोल नावाच्या सर्वोच्च घराण्याच्या वरदहस्तामुळे हातोबुद्धाला सिंहासनावर आरूढ होण्याची संधी मिळाली. हातोबुद्धाला राज्यकारभार मिळून सुमारे दहा वर्षे होत आली होती. परंतु प्रजेमध्ये हातोबुद्धाविषयी कमालीचा क्रोध होता.