क्षितीजावरती अजून आहे
कर्म आंधळे जन्माचे
कवेत घेऊ पाहते आहे
स्मरण उद्याच्या जगण्याचे
तनात वाजे आदिम संथ
थरथरणारी अनाम मुरली
ओठांमधुनी शीळ बनुनी
ब्रह्मांडातुन सत्वर फिरली
जरी स्वयंभू नसे कुणीही
तरी जसा तो मनु गलबती
सूर घेऊनी झेपावे अन
गहिरा पंचम यावा हाती
उगा कशाला उधार करणे
नभातल्या त्या देवापाशी
जुंपुन घ्यावे शब्दांना अन
गहाण पडावे शब्दांशी
खूप छान!
ReplyDelete