Friday, January 10, 2014


हायमास्टच्या दिव्यांखाली
मेट्रो वातावरणात,
तुला नुकत्याच निरोप दिलेल्या हातानी
अ‍ॅक्स्लरेट करत,
खटाखट गियर टाकत


मी केलेली आहे ही बाईक
रस्त्याकडून हवेच्या स्वाधीन.
साईनबोर्डांना मागे टाकत
मी जात असतो
तुझ्या शहरापासून दूर.
तुझ्या माझ्यातली
शपथ-मोडली वीण उसवत जाण्यासाठी
अजून किती ओळींची अंतरं पार करावी लागणारेत?

No comments:

Post a Comment