माझ्या कविता वाचणं काही दिवस टाळ त्यांना सद्ध्या व्हायरसची बाधा झालीये. लक्षणं माहित नाहीत पण परिणाम काव्यगत असतील. वरवर हवीहवीशी वाटणारी मात्रावृत्तं पसरतील तुझ्या शरीरात ...अफवेसारखी !
स्थळ: ठाणे स्टेशन. सकाळी ८:०३ ची पनवेल लोकल. सोमालियाच्या
पायरेट्सनाही लाजवेल अश्या पद्धतीने मी सहप्रवाश्यांशी लढा देऊन विंडोसीट
पटकावली. मनातल्या मनात ह्या अचिव्हमेंटसाठी गडगडाटी हास्य करत असतांनाच
शेजारी आणि समोर ठिकठिकाणी गंध लावलेले काही इसम येउन बसले. लोकल सुटायला
काही मिनीटे असतांना सदर व्यक्तींनी आपापल्या बॅगेतून झांजा वगैरे आयुधे
काढायला सुरवात केली. पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याचा अंदाज येत
असतांनाच
फार वर्षांपूर्वी मगध देशात एक हातोबुद्ध नावाचा राजा राज्य करत होता.
नावाप्रमाणेच तो हतबुद्ध होता आणि त्यास प्रजेला हातोहात फसवायची कला देखील
अवगत होती. त्याच्या सिंहासनामागे एक मोठे सिंहासन लपवून ठेवले आहे अशी
प्रजेत चर्चा होत असे. परंतु हातोबुद्ध ह्या चर्चेला नेहमीच अनावश्यक समजत
असे. हातोबुद्ध पूर्वी नरकेसरी नावाच्या राजाचा सल्लागार होता. परंतु
देशातील गांधझोल नावाच्या सर्वोच्च
घराण्याच्या वरदहस्तामुळे हातोबुद्धाला सिंहासनावर आरूढ होण्याची संधी
मिळाली. हातोबुद्धाला राज्यकारभार मिळून सुमारे दहा वर्षे होत आली होती.
परंतु प्रजेमध्ये हातोबुद्धाविषयी कमालीचा क्रोध होता.