कंटाळा आला आहे यार!
तोच तोचगंजलेला किनारा
त्याच बोथट पावसाच्या धारा
आणि जोडीला नेभळट वारा
चारदिशांचा पिंजरा
आणि आभाळाचं ओझं
नकोय हे सगळं...
एक नवीन पृथ्वी बांधू म्हणतो!
दुःखाचा गुडघाभर चिखल
सोबत विचारांचं जंगल
शंकांच्यावावटळी
अज्ञाताचा ताण
आणि तत्वांची हेळसांड!
नकोय हे सगळं
एक नवीन पृथ्वी बांधू म्हणतो!
जुन्या विचारांचा बुजबुजाट
पोथीवादाची रटरटआणि
कुत्र्याच्या छत्र्यांचा बाजार!
मूर्खांचा सुळसुळाट
भीतिचीजळमटं!
नकोय हे सगळं
एक नवीन पृथ्वी बांधू म्हणतो!!
झाडाला फ़ुलंयेतात पण
झाड बहरत नाही
समुद्र रोज खवळतो पण
त्यात गांभिर्य नाही,
उगाचतोच तोच पणाचा बालीशपणा
चंद्र-सूर्य येतात जातात
रुतू आपलं काम करतात
सकाळरात्रीला भेटत नाही
आणि पहाटेला संध्याकाळ दिसत नाही
कंटाळा आलाय यार!
एक नवीन पृथ्वी बांधू म्हणतो!
चिराग पत्की
१५.११.०७