Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

Thursday, January 9, 2014

हितोपदेशाचे न्यूजफीड: भाग १

फार वर्षांपूर्वी मगध देशात एक हातोबुद्ध नावाचा राजा राज्य करत होता. नावाप्रमाणेच तो हतबुद्ध होता आणि त्यास प्रजेला हातोहात फसवायची कला देखील अवगत होती. त्याच्या सिंहासनामागे एक मोठे सिंहासन लपवून ठेवले आहे अशी प्रजेत चर्चा होत असे. परंतु हातोबुद्ध ह्या चर्चेला नेहमीच अनावश्यक समजत असे. हातोबुद्ध पूर्वी नरकेसरी नावाच्या राजाचा सल्लागार होता. परंतु देशातील गांधझोल नावाच्या सर्वोच्च घराण्याच्या वरदहस्तामुळे हातोबुद्धाला सिंहासनावर आरूढ होण्याची संधी मिळाली. हातोबुद्धाला राज्यकारभार मिळून सुमारे दहा वर्षे होत आली होती. परंतु प्रजेमध्ये हातोबुद्धाविषयी कमालीचा क्रोध होता.